आपणच होऊ त्यांचे व्हॅलेंटाईन

कृपया शेअर करा

आजची स्त्री घराच्या रुढ चौकटीतून बाहेर पडली आहे. आता तिचा वावर जवळपास सर्वच क्षेत्रात आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती काम करते. स्वतःच्या कुटुंबाचे भरणपोषण करण्यासाठी ती सक्षम आहे. अर्थात अजूनही त्याचे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे. विपरीत परिस्थितीशी झुंज देऊन स्वतःचे अस्तित्त्व निर्माण करणाऱ्या अशा एकट्या महिलांची आपण जेंव्हा चर्चा करतो तेंव्हा मला माझ्या आजीची आवर्जून आठवण येते.

आई खुप लहान असतानाच माझे आजोबा सदुभाऊ शिंदे यांचे निधन झाले. त्यावेळी माझी आजी निर्मला शिंदे यांचे वय केवळ सत्तावीस वर्षांचं होतं. या संकटाला आजी मोठ्या धीराने सामोरी गेली. आजोबांच्या पश्चात तिनं सगळ्या मुलांचं संगोपन मोठ्या हिंमतीनं केलं. माझ्या आजीचं हे एकटीनं सर्व काही सांभाळणं म्हणजे नेमकं काय होतं त्याची कल्पना लहान वयात मला आली नाही, पण जसजसं जाणीवेच्या कक्षा रुंदावत गेल्या तसतशी मला ते उलगडत गेलं. आजीबद्दलचा माझा आदर अधिकच वाढला. कळत्या वयात मी विचार करायचे की, आजीला कधी एकटेपणा जाणवला असेल का ? हक्कानं मनातलं सगळं काही रिकामं करावं असा माणूस तिच्या आयुष्यातून तर केंव्हाच निघून गेला होता. अशा वेळी तिनं कितीदा तरी स्वतःशीच संवाद साधला असेल. स्वतःलाच तिनं जीवन जगण्यासाठी खंबीर केलं असेल. पुढे मी जेंव्हा सामाजीक जीवनात प्रवेश केला तेंव्हा अशा अनेक एकाकी महिलांशी माझा संपर्क आला. यशस्विनी, जागर, उमेद अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात मला थोडी का होईना अशा फुलविता आली, याचे समाधान आहे. मात्र ते पुरेसे नाही याची जाणीवही आहे. त्यांचा संघर्ष, जगण्याची धडपड या सर्वांशी मी जोडली गेली. त्या सर्वांमध्ये मी माझ्या आजीचा जीवनसंघर्ष पाहत असते.

आजीच्या जीवनसंघर्षात एक अदृश्य पोकळी आहे, असं मला नेहमी वाटतं. ती पोकळी तिनं कुठंच कधीच शेअर केली नसली तरीही… हीच पोकळी मला भेटायला येणाऱ्या एकल महिलांमध्ये जाणवते. कदाचित तीच त्यांना माझ्याशी घट्टपणे जोडणारा, किंबहुना माझ्यासाठी; मला तो धागा माझ्या दिवंगत आजीशी जोडतो. त्यांच्या एकटेपणाच्या वाळवंटात प्रेमासारख्या भावनेचं ओअसीस फुलायला हवं असं मला वाटतं म्हणूनच एकल महिलांविषयी लिहिण्यासाठी मी जाणीवपूर्वक १४ फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे निवडला आहे. हा दिवस प्रेमाचा संदेश देणारे युरोपातील संत व्हॅलेंटाईन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जातो. तत्कालिन रोमन सम्राटाचा आदेश झुगारुन संत व्हॅलेंटाईन यांनी सर्वदूर प्रेमाचा संदेश रुजविला (भारतीय समाजात आज विविध समाज घटकात हा प्रेमाचा संदेश देण्याची कधी नव्हे एवढी गरज निर्माण झाली आहे. कारण द्वेषाला, सूडाला बळ देणाऱ्या शक्ती प्रबळ होताना आपण रोजच अनुभवतो आहोत. ). त्यासाठी त्यांनी मरणही पत्करले. प्रेमासाठी मरण पत्करणारा हा संत म्हणूनच पुढच्या पिढ्यांसाठी प्रेमाचा संदेश देणारा देवदूत ठरला. प्रेम ही माणसाची अतिशय तरल भावना. ही भावना सर्वांसाठी आणि सर्वसमावेशक अशीच… म्हणूनच तिचे वेगळेपण नजरेत भरणारे ठरते.

व्हॅलेंटाईन डेच्या अनुषंगाने एकल महिलांचा मी विचार करते तेंव्हा माझ्यासमोर परीत्यक्ता, विधवा आणि इतर काही कारणांमुळे एकट्या राहिलेल्या महिलांचे चेहरे डोळ्यासमोर येतात. या महिला मानसिकदृष्ट्या कणखर जरी असल्या तरी अचानक आलेल्या संकटाने सुरुवातीच्या काळात कांहीशा बावरुन गेलेल्या असतात. पण संकटांचा सामना करण्याची जिद्द त्यांच्यात असते. क्वचितच एखादी स्त्री मानसिकदृष्ट्या कोलमडून पडलेली तुम्हाला आढळेल. हजारो संकटांचा सामना करुन त्या संकटांना परतावून लावतात. संकटांशी झुंजताना त्या अनेकदा माझ्याकडे खंत व्यक्त करतात ती म्हणजे जिथं आपण व्यक्त होऊ अशी एक जवळची व्यक्ती असायला हवी होती.

मला वाटतं, आयुष्याशी दोन हात करणाऱ्या या शूर महिलांसाठी आपण सर्वांनीच व्हॅलेंटाईन म्हणून उभे ठाकले पाहिजे. त्यांच्या मनात एकाकीपणाची भावना रुजू नये. त्यांच्या संघर्षाला सतत बळ मिळावं. त्यांना यश मिळावं म्हणून त्यांच्या पाठीशी नाही तर त्यांच्यासोबत रहायला हवं. याची सुरुवात अर्थातच घरातूनच व्हायला हवी. आई-वडील, भाऊ-बहीणी आणि इतर नातेवाईकांनी त्यांचे हे एकटेपण स्वीकारावं. त्यांना माणूस म्हणून त्यांची स्पेस जपू द्यावी. ही स्पेस त्यांच्यासाठी स्वतःशी हितगूज करण्यासाठी आवश्यक असते. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने आपण त्यांना ही भेट तर नक्कीच देऊ शकू, नाही का ? कारण आदरणीय कविवर्य कुसूमाग्रज म्हणतात त्याप्रमाणे,

“प्रेम आहे माणसाच्या
संस्कृतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
आणि भविष्यकालातील
अभ्युदयाची आशा एकमेव “
म्हणून हा आशेचा दीप तेवत ठेवूया…!

-सुप्रिया सुळे, खासदार

10 thoughts on “आपणच होऊ त्यांचे व्हॅलेंटाईन

 1. Prashant nanaware
  February 14, 2018 at 8:44 am

  Great Tai

  Reply
 2. कांचनदादा निगडे देशमुख
  February 14, 2018 at 9:58 am

  ताई,छान लिखाण,महिलांच्या सुख दुःखासी एकरूप होत त्यांना देत असलेला आधार खूप महत्वपुर्ण असून त्या आशावादी महिलांना आपण खरंच परमेश्वरी रूपच आहात, राजकारण सर्वच करतात पण,त्या ही पलीकडे जाऊन माणूस म्हणून आपण दिन दुबळ्यांची सेवा करणेसाठी वाहून घेतले आहे,आपले कष्ट,जिद्ध,त्यागी स्वभाव आदरणीय शरद पवार साहेबांचे संस्कार दाखवून देतात
  आज्जी बद्दल लिखाण एक उमेद वाढवणारे असून असंख्य महिलांना वैचारिक विध्यापिठ ठरू शकते
  ताई,आपल्या हातून होत असलेले कार्य,आपला मनमिळाऊ स्वभाव,दुसऱ्याच्या दुःखाने वेथीथ होणारे आपले अंतःकरण महाराष्ट्रभर आपण दिलासा देत कार्यरत असता त्यात दिसून येते
  परवा आपण सभेत वेक्त होत होतात की ज्या वेळी हल्ला बोल च्या दौऱ्यात बोंद अळी मुळे शेतकऱ्याने उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवला पण ते पाहून मी रात्र भर नाही झोपू शकले ताई ऐकणारांचे डोळे भरून आले शेतकऱ्यांना समजून घेणारे कोणीतरी आहे याची जाणीव झाली
  आज ग्रामीण भागात ताई आम्ही अनुभवतो आहोत बचत गटांच्या महिला,त्यांना जातीने लक्ष घालून देत असलेले ट्रेनिंग,रोजगार,मार्केटिंग,शिक्षणआरोग्य,आदी क्षेत्रातील आपली भरीव कामगिरी मजबूत संघटन करत आहे अगदी सहजपणे,निस्वार्थ
  ताई प्रणाम
  -कांचनदादा उर्फ दीपक निगडे देशमुख
  पुरंदर पुणे
  9881367471

  Reply
 3. Sunil patil
  February 14, 2018 at 11:19 am

  Khup chhan Tai..!!
  Ashya mahilasathi aapan tyanchya cheharyavar nakkich hasu aanalat. Ani dhairya dilat..

  Reply
 4. दत्तात्रय कृष्णा करडे
  February 14, 2018 at 11:30 am

  आदरणीय सुप्रिया ताई, आजींच्या आठवणीने तुम्ही जे लिहले आहे ते वाचकांसाठी प्रबाेधनात्मक आहे. आदरणीय साहेबांच्या (पिताश्रीं) पावलांवर पाऊल टाकत आपण करीत असलेले कार्य नजीकच्या काळात आपणांस यशाेशिखरांवर घेऊन जाईल यात तिळमात्र शंका नाही. आपलाच हितचिंतक दत्तात्रय कृष्णा करडे पुणे.

  Reply
 5. प्रवीण लहाने 9822565424
  February 14, 2018 at 12:14 pm

  ताई खुप छान आहे,
  तुमी करत असलेल्या यशस्वीनी अभियान अंतर्गत अनेक महिला जोडल्या गेल्या आहेत तुमच्याशी ,पण त्यांची गरज ओळखुन तुमि आ नकीन त्यांना प्रोत्साहन द्याल
  मी मुळात मराठवाडा येतून येतो भूम , उस्मानाबाद जिल्ह्यातील आमच्या भागात वैशाली ताई मोठे खूप चांगले काम करतात या सर्व महिलांसाठी आपल्या मार्गदर्शनाखाली , तर शेवटी एवढंच म्हणेल की ,# तळागाळातील निराधार महिलांसाठी तुमी आधार होवून जे जीवन संपवतात त्यांना खंबीरपणे उभे करायला प्रोत्साहित कराल , येणाऱ्या संकटाशी 2 हात करायला प्रेरणा द्याल, अशी अपेक्षा ..
  #प्रवीण लहाने #

  Reply
 6. श्री. राहूल मधुसूदन मराठे
  February 14, 2018 at 4:01 pm

  सुंदर

  Reply
 7. Dr.Suraina Malhotra
  February 14, 2018 at 6:36 pm

  Tai, what a fantastic thought.Giving them their due space & respecting it is the highest kind of love in any relationship…more so for the people deprived of it ,as age passes ..one partner is left behind.In such situations we as a ‘Valentine’ should always be with them as their mental strength.What a great thought.

  Reply
 8. Vyankat Wadaje
  February 14, 2018 at 7:18 pm

  Khup chan tai

  Reply
 9. Sandip Sharad Galinde
  February 15, 2018 at 1:49 pm

  Very nice Tai It is like thinking

  Reply
 10. शालीनी परदेशी, बीड
  February 15, 2018 at 11:11 pm

  मी आदरणीय ताईच्या यशस्वीनी मध्ये काम करते. आणि मला माझ्या ताईची कळत नकळत सारखी मदत असते. माझे व्हँलेनटाईन माझी ताईच आहे.

  Reply

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading