संघर्षमूर्ती सावित्रीमाई फुले

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव जेंव्हा मी घेते तेंव्हा माझ्या डोळ्यासमोर अथांग वात्सल्याची संघर्षमूर्ती उभा राहते. या माऊलीने तेंव्हा संघर्षाच्या वाटेवरुन चालायचे नाकारुन मळलेली वाट स्वीकारली असती तर माझ्यासारख्या असंख्य महिला आजही चुल आणी मूल या चौकटीतच बंद राहिल्या असत्या. ही चौकट मोडून महिलांना समाजात बरोबरीचे स्थान निर्माण करुन देण्यासाठी आयुष्यभर झगडलेल्या महात्मा जोतीबा फुले […]

संविधान जपण्यासाठी संविधान स्तंभ प्रेरणादायी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे संविधान. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी बाबासाहेबांनी या देशाला संविधान अर्पण केले होते. त्यामुळेच हा आजचा दिन संविधान दिन म्हणून पाळण्यात येतो. संविधानाप्रती श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात गेली काही दिवसांपासून आपण सार्वजनिक ठिकाणी संविधान स्तंभ उभारण्याचा उपक्रम राबवित आहोत. या स्तंभांवर […]

बापू : देशाचा आत्मा

आपल्या बारामती मतदारसंघात गावभेटींदरम्यान असताना त्या गावांच्या इतिहासाबद्दलही जाणून घेत असते. यामुळे त्या गावातील सांस्कृतिक मातीचा पोत पटकन लक्षात येतो आणि तिथल्या वातावरणाशी कनेक्ट करणं अधिक सोपं जातं. मी जेंव्हा खडकवासला येथे जाते तेंव्हा तेथील ग्रामपंचायतीजवळच्या तिठ्यावर एका वीजेच्या खांबाला लटकाविलेल्या पाटीकडे माझं आवर्जून लक्ष जातं. त्या पाटीवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या खडकवासला येथील आगमनाची […]

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर: कर्तव्यदक्ष व लोककल्याणकारी शासक

Punyashlok Rajmata Ahilyadevi Holkar

संसदेच्या आवारात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा एक अतिशय बोलका पुतळा आहे. प्रजेच्या हितासाठी अतिशय दक्ष असणाऱ्या या राजमातेचा पुतळा जेंव्हा दिसतो तेंव्हा त्यांच्यासमोर मी आपोआप नतमस्तक होते. कुशल सेनानी, प्रजेच्या हितासाठी दक्ष असणारी राज्यकर्ती, लोकांच्या सोयीसुविधांची काळजी घेत त्यांच्यासाठी पायाभूत सुविधांचे जाळे उभारणारी माऊली अशी अनेक रुपे डोळ्यासमोर उभी राहतात. अहिल्यादेवींच्या नावाचं गारुड अगदी लहानपणापासून […]

क्रांतीचे अग्रदूत

देशातील लोकशाही व्यवस्था एवढी बळकट का आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा जेंव्हा मी प्रयत्न केला तेंव्हा मला जाणवले की, येथे आहार-विहार-विचार आदींची विविधता असली तरी लोकसत्ताक मूल्यांबाबत जनता प्रचंड जागरुक आहे. ही जागरुकता एका दिवसात आलेली नाही तर ती सततच्या विचारप्रक्रियेतून येथील समाजमनात खोलवर रुजलेली आहे. यासाठी ज्या समाजसुधारकांनी प्रयत्न केले, त्यामध्ये महात्मा जोतीबा फुले […]

आम्हास वारसा शिवछत्रपतींचा… !

छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती… यानिमित्ताने त्यांना माझ्यासह संपूर्ण देश त्यांना मानाचा मुजरा करीत आहे. त्यांना वंदन करण्यासाठी त्यांच्यापुढे मान झुकविताना जन्म सार्थकी लागल्याचे समाधान मिळते. या युगप्रवर्तक राजाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर आजच्याच दिवशी झाला होता. सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती असतानाही महाराजांनी शून्यातून सर्वसामान्यांचे राज्य उभे केले. सर्वांना समान संधी दिली. खऱ्या अर्थाने समतेचे तत्त्व त्यांनी […]

Loading