महाराष्ट्राला स्वतंत्र गृहमंत्री हवा…

कृपया शेअर करा

प्रति,
मा. देवेंद्र फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र
मुंबई.

मा. महोदय,
महिला सुरक्षेच्या अतिशय गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी हे पत्र लिहीत आहे. आपल्या शासनकाळात महिलांवरील अत्याचारात लक्षणीयरित्या वाढ झाली असून काही गुन्ह्यांमध्ये तर महाराष्ट्राचा आलेख देशामध्ये उंचावलेला दिसतो. एनसीआरबीच्या अहवालात याची नोंद असून या नोंदी महाराष्ट्राला भूषणावह नाहीत.

महिला सुरक्षेचा मुद्दा करुन आपला पक्ष सत्तेवर आला आहे. आपण जनतेला महिला सुरक्षेसाठी कठोर उपाय करण्याचे आश्वासन दिले आहे. म्हणजेच आपण महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जरब बसेल अशी यंत्रणा निर्माण करणार होता. परंतु यातील एकही गोष्ट सध्या घडताना दिसत नाही. आपल्या शासनकाळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे, यामागे असणाऱ्या अनेक कारणांपैकी सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या सरकारमध्ये गृहखात्याला स्वतंत्र मंत्री नाही. हे खाते आपण स्वतःकडेच का ठेवले आहे याचे उत्तर आम्हाला अद्याप मिळाले नाही. मुंबईसारख्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरात अल्पवयीन मुलींचे अपहरण होण्याचे प्रमाण तब्बल पंधरा पटींनी वाढल्याचे वाचून धक्का बसला. विनयभंग, छेडछाड, बलात्कार यांसारख्या गुन्ह्यांचेही प्रमाण लक्षणीय असून देशात तसेच महाराष्ट्रातही त्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. महाराष्ट्रापुरतेच बोलायचे झाल्यास या गुन्ह्यांवर आणि गुन्हेगारांवर वचक बसविण्यास आपले सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. या अपयशाचा तुरा आपण आपल्या गृहमंत्री कम मुख्यमंत्री पदाच्या शिरपेचात लावणे पसंत कराल काय ?

मुख्यमंत्री साहेब, राज्यातील पोलीस यंत्रणा गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये अक्षरशः सैरभैर असून त्यांना खंबीर अशा गृहमंत्र्याची आवश्यकता आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीसांच्या कार्यक्षमतेचा देशातच नव्हे तर विदेशातही डंका आहे. परंतु त्यांना आवश्यक असणाऱ्या नेतृत्त्वाचा अभाव आपल्या सरकारच्या काळात आहे.
आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात गृहखात्यासाठी नेहमीच सक्षम मंत्री दिला. यामुळे पोलीस खाते अधिक सजगपणे आपले काम करु शकत होते.

मुलींना सुरक्षित वाटावे यासाठी खास छेडछाडविरोधी पथकाची आघाडी सरकारच्या काळात स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे छेडछाड करणाऱ्या समाजकंटकांवर पोलीस यंत्रणेचा वचक होता. त्यांना कठोर शासनही होत होते. परंतु आपल्या सरकारच्या काळात अशी प्रभावी यंत्रणा दिसत नाही.

आपणास मुख्यमंत्रीपदाचा भार सांभाळताना गृहखात्याकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळतच नाही हे स्पष्ट होत असून कृपया आपण या खात्याचा भार दुसऱ्या एखाद्या सक्षम मंत्र्याकडे सोपवावा, जेणेकरुन गृहखाते सक्षम होईल. महिलांच्या विरोधातील गुन्हे कमी होतील. राज्यातील लेकींचा आपणास दुवा मिळेल.

मुख्यमंत्री महोदय, आपण माझ्या पत्राची दखल घेऊन गृहखात्यासाठी स्वतंत्र मंत्र्याची नेमणूक अवश्य कराल ही अपेक्षा आहे.

धन्यवाद.
सुप्रिया सुळे, खासदार

4 thoughts on “महाराष्ट्राला स्वतंत्र गृहमंत्री हवा…

 1. कांचनदादा निगडे देशमुख
  April 25, 2018 at 10:56 am

  देश पातळीवर प्रथम क्रमांक च्या सुप्रियाताई या सांसद हे महाराष्ट्राला भूषणावह आहे वास्तविक सीएम साहेबानी मोठया मनाने व नैतिक जबाबदारी म्हणून महाराष्ट्र मंत्रीमंडळा चे वतीने महाराष्ट्रा चे जनतेचे वतीने आपला सत्कार घेऊन आपल्या सूचना व आदर्श महाराष्ट्राच्या दोन्ही हाऊस मध्ये ठेवायला हवा
  आपली रास्त मागणी असून ही आपला हक्क मागण्या साठी रस्त्यावर उतरायला लागते हीच समोरच्याची निष्क्रियता दर्शविते
  असो,ताई आपण महिलांना न्याय मिळवून देणेसाठी सदैव कार्यरत आहात हा महिलांना डोंगरा एवढा आधार आहे
  आपण आवर्जून पोलीस खात्याचा उल्लेख केलात त्यांच्या बाबत खूप रास्त भावना मांडल्या जागतिक स्तरावर मुंबई पोलिसांची ओळख अबाधित राहिला हवी
  -दीपक / कांचनदादा निगडे देधमुख
  पुरंदर

  Reply
 2. शैलेश राऊत
  April 25, 2018 at 7:53 pm

  देशातील कार्यक्षम, अभ्यासु खासदार मा.सुप्रिया ताई यांनी महाराष्ट्रातील वस्तुस्थिती मांडली आहे.
  डोळ्याला झापड लावलेले शासन याकडे आता लक्ष देईल का? हा खरा प्रश्न आहे.
  ताईंनी सुरु केलेल्या लढ्याला आता जनतेने साथ देऊन हे कुमी, फसवे सरकार जागे केले पाहिजे.

  Reply
 3. शैलेश राऊत
  April 25, 2018 at 7:55 pm

  शातील कार्यक्षम, अभ्यासु खासदार मा.सुप्रिया ताई यांनी महाराष्ट्रातील वस्तुस्थिती मांडली आहे.
  डोळ्याला झापड लावलेले शासन याकडे आता लक्ष देईल का? हा खरा प्रश्न आहे.
  ताईंनी सुरु केलेल्या लढ्याला आता जनतेने साथ देऊन हे कुचकामी, फसवे सरकार जागे केले पाहिजे.

  Reply
 4. Sachin Kurade
  April 26, 2018 at 12:49 am

  ताई, नक्कीच स्वतंत्र गृहमंत्र्यांनी आवश्यकता आहे, मुख्यमंत्र्यांना त्यांच्या होम टाऊन नागपूर मधील गुंड गिरी थोपवता आली नाही. काही गुंड हत्यार घेऊन दहशत माजवत असलेल्या बातम्या आल्या. फक्त राजकीय फायद्यासाठी गृहमंत्री पद वापरण हे महाराष्ट्राच्या अस्मितेला साजेस नाही. स्व आबांनी हे पद एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं. आता आपल्या पत्राची दखल मुख्यमंत्री घेतील ही अपेक्षा आहे.

  Reply

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading